Saturday, May 21, 2022

Smarth Ramdas Swami’s Letter to Sambhaji Maharaj

Smarth Ramdas Swami’s Letter to Sambhaji Maharaj


Samarth Ramdas also known as Sant Ramdas or Ramdas Swami was an Indian Hindu saint, philosopher, poet, writer and spiritual master. He was a devotee of the Hindu deities Rama and Hanuman.Ramdas had extensive literature written during his lifetime. His literary works include Dasbodh.


अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे|तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१||

O King, always remain Alert! never be pissed off by situations, and don't forget to consult your army, that too away from public places.


काही उग्रस्थिती सांडावी| काही सौम्यता धरावी|चिंता लागावी परावी अंतर्यामी||२||

Please give away your Anger and Harsh nature, which may act as obstacles in your thought process. Be calm and polite, and don't forget that you should always be thinking of your ultimate goal and that is salvation.


मागील अपराध क्षमावे| कारभारी हाती धरावे|सुखी करुनि सोडावे| कामाकडे||३||

Forgive those who made mistakes, hold the people that are useful for your work, please them and make them more focused on their tasks by motivating them.


पाटवणी तुंब निघेना| तरी मग पाणी चालेना|तैसे सज्जनांच्या मना| कळले पाहिजे||४||

If you put obstacles in a stream, the flow of water stops, these the example that a wise man should always keep in his mind.


जनांचा प्रवाहों चालिला| म्हणजे कार्यभाग आटोपला|जन ठायी ठायी तुंबला| म्हाणिजे खोटे||५||

Similarly when a mob of people is flowing, it means everything is going fine, but if people are gathering in clusters, you should always understand that something is going wrong!


श्रेष्ठी जे जे मेळविले| त्यासाठी भांडत बैसले|मग जाणावे फावले| गनिमासी||६||

If one starts fighting for the property and the kingdom gained by your forefathers, be sure that this will make your enemies happy and give them a chance to attack you.


ऐसे सहसा करू नये| दोघे भांडता तिसय्रासी जाए|धीर धरून महत्कार्य| समजून करावे||७||

So please don't do such a thing, remember, when two people are fighting, the benefit is always to the third party. So keep following the path to your goal with courage and patience.


आधीच पडला धस्ती| म्हणजे कार्यभाग होय नास्ती|याकारणे समस्ती| बुद्धि शोधावी||८||

If you threaten the people, you won't be able to get your work done from them so everyone should use his brain before deploying people and giving orders to them.


राजी राखता जग| मग कार्यभागाची लगबग|ऐसे जाणोनिया सांग | समाधान राखावे||९||

When the world is pleased, it will give you 100% output. Knowing this fact, keep your people happy and satisfied all the time.


सकळ लोक एक करावे| गनीम निपटुन काढावे|ऐसे करीता कीर्ति धावे| दिगंतरी||१०||

Unite the people , Attack and demolish your enemies, beat them up! And thus your name and fame will automatically spread to all directions!


आधी गाजवावे तडाके| मग भूमंडळ धाके|ऐसे न होता धक्के| राज्यास होती||११||

To generate fear about you , in the minds of your enemies, you need to attack first and not them! If you attack them first, they will fear you, but if you fail to do so, then you will be attacked by them for sure!


समय प्रसंग वोळखावा| राग निपटुन काढावा|आला तरी कळो नेदावा| जनांमध्ये||१२||

You should be able to wisely study a given situation. Beat your anger. And even if you are angry, don't express your anger in public.


राज्यामध्ये सकळ लोक| सलगी देवून करावे सेवक|लोकांचे मनामध्ये धाक| उपजोचि नये||१३||

All the common people in your state, should be used for serving you withoutgenerating fear in their mind about the master. In any case they should not bethreatened.


बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे|कष्टे करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||

Gather all the people. a Diverse mob, and make them think alike! give them onegoal, take whatever efforts you need to take for this and let them attack theMlenchhas, meaning people that believe only one God exists and those whodoesn't follow their cult are kafirs.


मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।जो जे मतीं सांपडलां। तयास तेंचि थोर।

Millions of opinions flying around makes it difficult because each starts believing in the superiority of his opinion (which makes uniting men for one cause difficult.


आहे तितुके जतन करावे| पुढे आणिक मेळवावे|महाराष्ट्र राज्य करावे |जिकडे तिकडे||१५||

Do whatever you can do for the welfare of this state. Gather more people as timegoes ahead, and make a powerful MAHARASHTRA state everywhere! 


लोकी हिम्मत धरावी| शर्तीची तरवार करावी|चढ़ती वाढती पदवी| पावाल येणे||१६||

Keep courage! Cross extremes using your sword! and thus you will achieve thestate that is always growing!


देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।मुलुख बुडवावा की बडवावा। स्वराज्या कारणे।

Remember your great Father King Shivaji! Keep in mind that your life is like agrass leaf in front of his life, if you cannot remain famous like your father in earthand everywhere else!


देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।मुलुख बुडवावा की बडवावा। स्वराज्या कारणे।

Remember how Shivaji looked, remember how Shivaji striven hard, Remember the Victorious King Shivaji to be successful in this world.Bow to Raama and create a storm all over.. beat and drown the enemy provinces and assimilate them...


देशद्रोही तितुके कुत्ते । मारोन घालावे परते।देवदास पावती फत्ते। यदर्थी संशयो नाही।

The traitors are the real rabid dogs and should be slain similarly.. Any servant of sri Raama who does this, wins for sure..


धर्मासाठी झुंजावे|झुंझोनी अवघ्यासी मारावे ||मारिता मारिता घ्यावे|राज्य आपुले

Prepare to fight for Dharma... While fighting, kill as many as you can.. Keep on working towards finishing the task (of establishing dharma and hindavi swaraj), even while fighting and killing..


.शिवरायास आठवावे| जीवित्व तृणवत मानावे|इहलोकी परलोकी राहावे| कीर्तीरुपे||१७||

Remember your father, Shivaji.. Compare yourselves with him and do not think of yourselves too highly .. Learn from him how to live forever...


शिवरायांचे आठवावे स्वरूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप|शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी||१८||

Remember how he looked... Remember what he achieved.. Remember how he thought.. while on this earth.. 


शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांची सलगी देणे| कैसे असे||१९|| 

Remember how he walked.. Remember how he talked.. Remember how he loved his people... 


सकळ सुखांचा त्याग| करुनी साधिजे तो योग| राज्यसाधनाची लगबग| ऐसी असे||२०|| 

Renunciating all pleasures, he achieved the Raaja-Yoga.. Study how he did it.. 


त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणावे पुरूष| या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१|| 

If you manage to achieve something like this, only then shall I consider you a man.. What more to write now? 



Sunday, February 2, 2020

उपासना : प्रार्थना

श्रीराम समर्थ
|| जय जय रघुवीर समर्थ ||

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू  |  गुरुः देवो महेश्वरा |
गुरु शाक्षात परब्रम्हा | तस्मै श्री गुरुवे नमः ||

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
 द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी: साक्षीभूतम् । 
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। 

काषायवस्त्रं करदंडधारिणं  | कमंडलुं पदमकरेण शंखंम्  |
चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं  | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये  ||

ध्यानमूलं  सद्गुरूमूर्ति  | पूजामूलं  सद्गुरो:  पद: |
मंत्रमूलं सद्गुरू वाक्य  | मोक्ष मुलं सद्गुरू कृपा ||

अज्ञान मूल हरणं  | जन्म कर्म निवारण |
ज्ञानवैराग्य सिद्ध्यथ  | सद्गुरू पादोदक पिबेत ||


कृते जनादर्नो:त्रेतायाम रघुनंदन: |
 व्दापारे रामकृष्ण:च कलौ श्रीपादश्रीवल्लभ: ||
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । 
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। 

या कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । 
 या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता । 
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाडयापहा ।।


सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। 

मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ । 
वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।  जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।  तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥

सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणी देह माझा पडावा. |
उपेक्षु नको गुणवंता अनंता. | रघुनायका मागणे हेचि आता. ||

उपासनेला दृढ चालवावे | भूदेव संतांसी सदा नमावे |
सत्कर्म योगे वय घालवावे | सर्वा मुखी मंगल बोलवावे ||

ज्या ज्या स्थळी मन जाय माझे  | त्या त्या  स्थळी निजरुप  तुझे ||
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी | तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ||

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । 
 सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
यानी कानी च पापानि , जन्मान्तर कृतानि च |
 तानी तानी विनश्यन्ति , प्रदक्षिण पदे पदे ||

        || जय जय रघुवीर समर्थ ||



Share with your friend and family :


अध्याय चौदावा


अध्याय चौदावा


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीसद्गुरूभ्यो नमः ॥

नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । 
प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥

जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । 
पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥

उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं । 
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । 
सद्गुरूचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥

ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं । 
तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥

सद्गुरूभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु । 
पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥

तया सायंदेव द्विजासी । श्रीसद्गुरू बोलती संतोषीं । 
भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥

ऐकोनि श्रीसद्गुरूचें वचन । सायंदेव विप्र करी नमन ।
 माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥

जय जया जगद्गुरू । त्रयमूर्तीचा अवतारू । 
अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥

विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । 
धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥

तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । 
मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें सद्गुरूमूर्ति ॥११॥

माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं । 
इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥

ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं । 
सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥

प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं । 
याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥

जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण । 
भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥१५॥

संतोषोनि श्रीसद्गुरूमूर्ति । अभयंकर आपुले हातीं ।
 विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥

भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें । 
संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥

जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं । 
तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥

निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं । 
अखिलाभीष्ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥

तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं । 
अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥२०॥

ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । 
जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥

कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा ।
 ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप होता जाहला ॥२२॥

विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत ।
 विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीसद्गुरूसी ध्यातसे ॥२३॥।


कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी । 
श्रीसद्गुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्ट ॥२४॥


गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी ।
 तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीसद्गुरूची ॥२५॥

कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । 
श्रीसद्गुरूकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥

ज्याचे ह्रुदयीं श्रीसद्गुरूस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण । 
काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥

ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय । 
श्रीसद्गुरूकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥

ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन ।
 सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥

ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं । 
प्राणांतक व्यथेसीं । कष्टतसे तये वेळीं ॥३०॥

स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई ।
 छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥

स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । 
लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥

येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि ।
 वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥

संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र ।
 गंगातीरीं असे वासर । श्रीसद्गुरूचे चरणदर्शना ॥३४॥

देखोनियां श्रीसद्गुरूसी । नमन करी तो भावेसीं ।
 स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥

संतोषोनि श्रीसद्गुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । 
दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥

ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून ।
 न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥

तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका । 
संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥

उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । 
तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥

भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति ।
 सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥

येणेंपरी श्रीसद्गुरूसी । विनवी विप्र भावेसीं ।
 संतोषोनि विनयेसीं । श्रीसद्गुरू म्हणती तये वेळीं ॥४१॥

कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे ।
 पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥४२॥

आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित । 
कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥

न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्टें गेलीं दुःखें ।
 म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥४४॥

ऐसेपरी संतोषोनि । श्रीसद्गुरू निघाले तेथोनि । 
जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥

समस्त शिष्यांसमवेत । श्रीसद्गुरू आले तीर्थे पहात । 
प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥

नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । 
होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥

गंगाधराचा नंदनु । सांगे सद्गुरूचरित्र कामधेनु । 
सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस ॥४८॥

पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु । 
मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥

इति श्रीसद्गुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम
चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥




श्रीसद्गुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीसद्गुरूदेव दत्त ॥




Share with your friend and family :


मंगलाचरण


| श्रीरामसमर्थ ||

|| श्रीमत् दासबोध ||

समास पहिला : मंगलाचरण || १.१ ||

॥श्रीरामसमर्थ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें
जी येथ | श्रवण केलियानें प्राप्त | काय आहे ||१||



ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद |
येथ  बोलिला  विशद  |  भक्तिमार्ग  ||२||



नवविधा भक्ति  आणि ज्ञान | बोलिलें वैराग्याचें
लक्षण | बहुधा अध्यात्मनिरोपण | निरोपिलें ||३||



भक्तिचेन योगें देव | निश्चयें पावती मानव |
ऐसा  आहे  अभिप्राव  |  ईये  ग्रन्थीं ||४||



मुख्य भक्तीचा निश्चयो | शुद्ध ज्ञानाचा निश्चयो |
आत्मस्थितीचा  निश्चयो | बोलिला  असे ||५||



शुद्ध उपदेशाचा निश्चयो | सायोज्यमुक्तीचा निश्चयो |
मोक्षप्राप्तीचा  निश्चयो  |  बोलिला  असे ||६||



शुद्ध स्वरूपाचा निश्चयो | विदेहस्थितीचा निश्चयो |
अलिप्तपणाचा  निश्चयो | बोलिला  असे ||७||



मुख्य देवाचा निश्चयो | मुख्य भक्ताचा निश्चयो |
जीवशिवाचा  निश्चयो | बोलिला  असे  ||८||



मुख्य ब्रह्माचा निश्चयो | नाना मतांचा निश्चयो |
आपण कोण हा निश्चयो  |  बोलिला असे ||९||



मुख्य उपासनालक्षण | नाना कवित्वलक्षण |
नाना  चातुर्यलक्षण  |  बोलिलें  असे ||१०||



मायोद्भवाचें लक्षण | पंचभूतांचे  लक्षण |
कर्ता कोण हें लक्षण | बोलिलें असे ||११||



नाना किंत निवारिले | नाना संशयो छेदिले |
नाना  आशंका  फेडिले | नाना  प्रश्न  ||१२||



ऐसें बहुधा निरोपिलें | ग्रन्थगर्भी जें बोलिलें |
तें अवघेंचि अनुवादलें | न वचे किं कदा ||१३||



तथापि अवघा दासबोध | दशक फोडून केला विशद |
जे जे दशकींचा अनुवाद | ते ते दशकीं बोलिला ||१४||



नाना ग्रन्थांच्या संमती | उपनिषदें वेदांत श्रुती |
आणि  मुख्य  आत्मप्रचीती | शास्त्रेंसहित ||१५||



नाना संमतीअन्वये |  म्हणौनि मिथ्या म्हणतां नये |
तथापि  हें  अनुभवासि  ये | प्रत्यक्ष  आतां  ||१६||



मत्सरें यासी  मिथ्या  म्हणती | तरी अवघेचि ग्रन्थ
उछेदती | नाना ग्रन्थांच्या संमती | भगवद्वाक्यें ||१७||



शिवगीता  रामगीता | गुरुगीता  गर्भगीता |
उत्तरगीता अवधूतगीता | वेद आणी वेदांत ||१८||



भगवद्‍गीता ब्रह्मगीता | हंसगीता पांडवगीता |
गणेशगीता येमगीता | उपनिषदें  भागवत ||१९||



इत्यादिक  नाना  ग्रन्थ | संमतीस बोलिले
येथ | भगवद्वाक्ये येथार्थ | निश्चयेंसीं ||२०||



भगवद्वचनीं अविश्वासे | ऐसा कोण पतित असे | 
भगवद्वाक्याविरहित नसे | बोलणें येथीचें ||२१||



पूर्णग्रन्थ पाहिल्याविण | उगाच ठेवी जो दूषण |
तो  दुरात्मा  दुराभिमान | मत्सरें  करी  ||२२||



अभिमानें उठे मत्सर | मत्सरें ये तिरस्कार |
पुढें  क्रोधाचा  विकार | प्रबळे  बळें ||२३||



ऐसा अंतरी नासला | कामक्रोधें खवळला |
अहंभावें  पालटला | प्रत्यक्ष  दिसे  ||२४||



कामक्रोधें लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |
अमृत  सेवितांच  पावला | मृत्य  राहो ||२५||



आतां असो हें बोलणें | अधिकारासारिखें घेणें |
परंतु  अभिमान  त्यागणें | हें उत्तमोत्तम ||२६||



मागां श्रोतीं आक्षेपिलें | जी ये ग्रन्थीं काय बोलिलें |
तें  सकळहि  निरोपिलें  |  संकळित  मार्गे ||२७||



आतां  श्रवण  केलियाचें फळ | क्रिया पालटे
तत्काळ | तुटे संशयाचें मूळ | येकसरां ||२८||



मार्ग सांपडे सुगम | नलगे साधन दुर्गम |
सायोज्यमुक्तीचें  वर्म | ठाइं  पडें  ||२९||



नासे अज्ञान  दुःख भ्रांती | शीघ्रचि येथें ज्ञान-
प्राप्ती |  ऐसी आहे फळश्रुती | ईये ग्रन्थीं ||३०||



योगियांचे परम भाग्य | आंगीं बाणें तें वैराग्य |
चातुर्य  कळे  यथायोग्य | विवेकेंसहित  ||३१||



भ्रांत अवगुणी अवलक्षण | तेचि होती सुलक्षण |
धूर्त तार्किक विचक्षण | समयो जाणती ||३२||



आळसी तेचि साक्षपी होती | पापी तेचि प्रस्तावती |
निंदक  तेचि  वंदूं  लागती | भक्तिमार्गासी  ||३३||



बद्धची होती मुमुक्ष | मूर्ख होती अति दक्ष |
अभक्तची  पावती मोक्ष | भक्तिमार्गें  ||३४||



नाना दोष ते नासती | पतित तेचि पावन होती |
प्राणी  पावे  उत्तम  गती | श्रवणमात्रें  ||३५||



नाना धोकें देहबुद्धीचे | नाना किंत संदेहाचे |
नाना  उद्वेग संसाराचे | नासती श्रवणें ||३६||



ऐसी याची फलश्रुती | श्रवणें चुके अधोगती |
मनास  होय  विश्रांती  |  समाधान  ||३७||



जयाचा भावार्थ जैसा | तयास  लाभ  तैसा |
मत्सर धरी जो पुंसा | तयास तेंचि प्राप्त ||३८||



इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मंगलाचरणनाम समास पहिला || १.१ ||





Share with your friend and family :