Sunday, February 2, 2020

उपासना : प्रार्थना

श्रीराम समर्थ
|| जय जय रघुवीर समर्थ ||

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू  |  गुरुः देवो महेश्वरा |
गुरु शाक्षात परब्रम्हा | तस्मै श्री गुरुवे नमः ||

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
 द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी: साक्षीभूतम् । 
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। 

काषायवस्त्रं करदंडधारिणं  | कमंडलुं पदमकरेण शंखंम्  |
चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं  | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये  ||

ध्यानमूलं  सद्गुरूमूर्ति  | पूजामूलं  सद्गुरो:  पद: |
मंत्रमूलं सद्गुरू वाक्य  | मोक्ष मुलं सद्गुरू कृपा ||

अज्ञान मूल हरणं  | जन्म कर्म निवारण |
ज्ञानवैराग्य सिद्ध्यथ  | सद्गुरू पादोदक पिबेत ||


कृते जनादर्नो:त्रेतायाम रघुनंदन: |
 व्दापारे रामकृष्ण:च कलौ श्रीपादश्रीवल्लभ: ||
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । 
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। 

या कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । 
 या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता । 
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाडयापहा ।।


सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। 

मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ । 
वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।  जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।  तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥

सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणी देह माझा पडावा. |
उपेक्षु नको गुणवंता अनंता. | रघुनायका मागणे हेचि आता. ||

उपासनेला दृढ चालवावे | भूदेव संतांसी सदा नमावे |
सत्कर्म योगे वय घालवावे | सर्वा मुखी मंगल बोलवावे ||

ज्या ज्या स्थळी मन जाय माझे  | त्या त्या  स्थळी निजरुप  तुझे ||
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी | तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ||

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । 
 सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
यानी कानी च पापानि , जन्मान्तर कृतानि च |
 तानी तानी विनश्यन्ति , प्रदक्षिण पदे पदे ||

        || जय जय रघुवीर समर्थ ||



Share with your friend and family :


अध्याय चौदावा


अध्याय चौदावा


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीसद्गुरूभ्यो नमः ॥

नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । 
प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥

जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । 
पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥

उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं । 
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । 
सद्गुरूचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥

ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं । 
तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥

सद्गुरूभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु । 
पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥

तया सायंदेव द्विजासी । श्रीसद्गुरू बोलती संतोषीं । 
भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥

ऐकोनि श्रीसद्गुरूचें वचन । सायंदेव विप्र करी नमन ।
 माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥

जय जया जगद्गुरू । त्रयमूर्तीचा अवतारू । 
अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥

विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । 
धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥

तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । 
मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें सद्गुरूमूर्ति ॥११॥

माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं । 
इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥

ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं । 
सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥

प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं । 
याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥

जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण । 
भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥१५॥

संतोषोनि श्रीसद्गुरूमूर्ति । अभयंकर आपुले हातीं ।
 विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥

भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें । 
संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥

जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं । 
तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥

निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं । 
अखिलाभीष्ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥

तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं । 
अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥२०॥

ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । 
जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥

कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा ।
 ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप होता जाहला ॥२२॥

विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत ।
 विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीसद्गुरूसी ध्यातसे ॥२३॥।


कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी । 
श्रीसद्गुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्ट ॥२४॥


गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी ।
 तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीसद्गुरूची ॥२५॥

कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । 
श्रीसद्गुरूकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥

ज्याचे ह्रुदयीं श्रीसद्गुरूस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण । 
काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥

ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय । 
श्रीसद्गुरूकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥

ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन ।
 सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥

ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं । 
प्राणांतक व्यथेसीं । कष्टतसे तये वेळीं ॥३०॥

स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई ।
 छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥

स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । 
लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥

येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि ।
 वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥

संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र ।
 गंगातीरीं असे वासर । श्रीसद्गुरूचे चरणदर्शना ॥३४॥

देखोनियां श्रीसद्गुरूसी । नमन करी तो भावेसीं ।
 स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥

संतोषोनि श्रीसद्गुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । 
दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥

ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून ।
 न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥

तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका । 
संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥

उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । 
तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥

भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति ।
 सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥

येणेंपरी श्रीसद्गुरूसी । विनवी विप्र भावेसीं ।
 संतोषोनि विनयेसीं । श्रीसद्गुरू म्हणती तये वेळीं ॥४१॥

कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे ।
 पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥४२॥

आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित । 
कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥

न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्टें गेलीं दुःखें ।
 म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥४४॥

ऐसेपरी संतोषोनि । श्रीसद्गुरू निघाले तेथोनि । 
जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥

समस्त शिष्यांसमवेत । श्रीसद्गुरू आले तीर्थे पहात । 
प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥

नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । 
होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥

गंगाधराचा नंदनु । सांगे सद्गुरूचरित्र कामधेनु । 
सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस ॥४८॥

पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु । 
मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥

इति श्रीसद्गुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम
चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥




श्रीसद्गुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीसद्गुरूदेव दत्त ॥




Share with your friend and family :


मंगलाचरण


| श्रीरामसमर्थ ||

|| श्रीमत् दासबोध ||

समास पहिला : मंगलाचरण || १.१ ||

॥श्रीरामसमर्थ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें
जी येथ | श्रवण केलियानें प्राप्त | काय आहे ||१||



ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद |
येथ  बोलिला  विशद  |  भक्तिमार्ग  ||२||



नवविधा भक्ति  आणि ज्ञान | बोलिलें वैराग्याचें
लक्षण | बहुधा अध्यात्मनिरोपण | निरोपिलें ||३||



भक्तिचेन योगें देव | निश्चयें पावती मानव |
ऐसा  आहे  अभिप्राव  |  ईये  ग्रन्थीं ||४||



मुख्य भक्तीचा निश्चयो | शुद्ध ज्ञानाचा निश्चयो |
आत्मस्थितीचा  निश्चयो | बोलिला  असे ||५||



शुद्ध उपदेशाचा निश्चयो | सायोज्यमुक्तीचा निश्चयो |
मोक्षप्राप्तीचा  निश्चयो  |  बोलिला  असे ||६||



शुद्ध स्वरूपाचा निश्चयो | विदेहस्थितीचा निश्चयो |
अलिप्तपणाचा  निश्चयो | बोलिला  असे ||७||



मुख्य देवाचा निश्चयो | मुख्य भक्ताचा निश्चयो |
जीवशिवाचा  निश्चयो | बोलिला  असे  ||८||



मुख्य ब्रह्माचा निश्चयो | नाना मतांचा निश्चयो |
आपण कोण हा निश्चयो  |  बोलिला असे ||९||



मुख्य उपासनालक्षण | नाना कवित्वलक्षण |
नाना  चातुर्यलक्षण  |  बोलिलें  असे ||१०||



मायोद्भवाचें लक्षण | पंचभूतांचे  लक्षण |
कर्ता कोण हें लक्षण | बोलिलें असे ||११||



नाना किंत निवारिले | नाना संशयो छेदिले |
नाना  आशंका  फेडिले | नाना  प्रश्न  ||१२||



ऐसें बहुधा निरोपिलें | ग्रन्थगर्भी जें बोलिलें |
तें अवघेंचि अनुवादलें | न वचे किं कदा ||१३||



तथापि अवघा दासबोध | दशक फोडून केला विशद |
जे जे दशकींचा अनुवाद | ते ते दशकीं बोलिला ||१४||



नाना ग्रन्थांच्या संमती | उपनिषदें वेदांत श्रुती |
आणि  मुख्य  आत्मप्रचीती | शास्त्रेंसहित ||१५||



नाना संमतीअन्वये |  म्हणौनि मिथ्या म्हणतां नये |
तथापि  हें  अनुभवासि  ये | प्रत्यक्ष  आतां  ||१६||



मत्सरें यासी  मिथ्या  म्हणती | तरी अवघेचि ग्रन्थ
उछेदती | नाना ग्रन्थांच्या संमती | भगवद्वाक्यें ||१७||



शिवगीता  रामगीता | गुरुगीता  गर्भगीता |
उत्तरगीता अवधूतगीता | वेद आणी वेदांत ||१८||



भगवद्‍गीता ब्रह्मगीता | हंसगीता पांडवगीता |
गणेशगीता येमगीता | उपनिषदें  भागवत ||१९||



इत्यादिक  नाना  ग्रन्थ | संमतीस बोलिले
येथ | भगवद्वाक्ये येथार्थ | निश्चयेंसीं ||२०||



भगवद्वचनीं अविश्वासे | ऐसा कोण पतित असे | 
भगवद्वाक्याविरहित नसे | बोलणें येथीचें ||२१||



पूर्णग्रन्थ पाहिल्याविण | उगाच ठेवी जो दूषण |
तो  दुरात्मा  दुराभिमान | मत्सरें  करी  ||२२||



अभिमानें उठे मत्सर | मत्सरें ये तिरस्कार |
पुढें  क्रोधाचा  विकार | प्रबळे  बळें ||२३||



ऐसा अंतरी नासला | कामक्रोधें खवळला |
अहंभावें  पालटला | प्रत्यक्ष  दिसे  ||२४||



कामक्रोधें लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |
अमृत  सेवितांच  पावला | मृत्य  राहो ||२५||



आतां असो हें बोलणें | अधिकारासारिखें घेणें |
परंतु  अभिमान  त्यागणें | हें उत्तमोत्तम ||२६||



मागां श्रोतीं आक्षेपिलें | जी ये ग्रन्थीं काय बोलिलें |
तें  सकळहि  निरोपिलें  |  संकळित  मार्गे ||२७||



आतां  श्रवण  केलियाचें फळ | क्रिया पालटे
तत्काळ | तुटे संशयाचें मूळ | येकसरां ||२८||



मार्ग सांपडे सुगम | नलगे साधन दुर्गम |
सायोज्यमुक्तीचें  वर्म | ठाइं  पडें  ||२९||



नासे अज्ञान  दुःख भ्रांती | शीघ्रचि येथें ज्ञान-
प्राप्ती |  ऐसी आहे फळश्रुती | ईये ग्रन्थीं ||३०||



योगियांचे परम भाग्य | आंगीं बाणें तें वैराग्य |
चातुर्य  कळे  यथायोग्य | विवेकेंसहित  ||३१||



भ्रांत अवगुणी अवलक्षण | तेचि होती सुलक्षण |
धूर्त तार्किक विचक्षण | समयो जाणती ||३२||



आळसी तेचि साक्षपी होती | पापी तेचि प्रस्तावती |
निंदक  तेचि  वंदूं  लागती | भक्तिमार्गासी  ||३३||



बद्धची होती मुमुक्ष | मूर्ख होती अति दक्ष |
अभक्तची  पावती मोक्ष | भक्तिमार्गें  ||३४||



नाना दोष ते नासती | पतित तेचि पावन होती |
प्राणी  पावे  उत्तम  गती | श्रवणमात्रें  ||३५||



नाना धोकें देहबुद्धीचे | नाना किंत संदेहाचे |
नाना  उद्वेग संसाराचे | नासती श्रवणें ||३६||



ऐसी याची फलश्रुती | श्रवणें चुके अधोगती |
मनास  होय  विश्रांती  |  समाधान  ||३७||



जयाचा भावार्थ जैसा | तयास  लाभ  तैसा |
मत्सर धरी जो पुंसा | तयास तेंचि प्राप्त ||३८||



इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मंगलाचरणनाम समास पहिला || १.१ ||





Share with your friend and family :


समर्थ उपासना - नामस्मरण






0


Share with your friend and family :